भजनी मालिका
← भजनांकडे परत

देह पाहतां दोषाची दिठी । वृत्ती दिसे तैं स्वरुपीं मिठीं

deh pahatan doshachi dithi | vrutti dise tain svarupin mithin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देह पाहतां दोषाची दिठी । वृत्ती दिसे तैं स्वरुपीं मिठीं ॥१॥ कैसेनी हरिदास भासती । देही असे तंव दोष दिसती ॥२॥ देह दिसतां न दिसे भावो । वृत्ती दिसे तंव समाधान पहा हो ॥३॥ एका जनार्दनाच्या पाही । वृत्ती दिसे तैं दोष नाहीं ॥४॥