भजनी मालिका
← भजनांकडे परत

देह हा काळाचा जाणार शेवटीं । याची धरुनी मिठी गोडी काय

deh ha kalacha janar shevatin | yachi dharuni mithi godi kay

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देह हा काळाचा जाणार शेवटीं । याची धरुनी मिठी गोडी काय ॥१॥ जाणार जाणार जाणार हें विश्व । वाउगाचि सोस करसी काय ॥२॥ प्रपंच काबाड एरंडाचे परी । रसस्वाद तरी कांहीं नाहीं ॥३॥ नाशिवंतासाठीं रडतोसी वायां । जनार्दनीं शरण निघे तूं पायां ॥४॥ एका जनार्दनीं भेटी होतां संतांची । मग जन्ममरनाची चिंता नाहीं ॥५॥