भजनी मालिका
← भजनांकडे परत

दासोपंतांचा अभिमान । गेला घेताचि दर्शन

dasopantancha abhiman | gela ghetachi darshan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
दासोपंतांचा अभिमान । गेला घेताचि दर्शन ॥१॥ धन्य धन्य एकनाथा । तुमचे चरणी माझा माथा ॥२॥ दत्तात्रय चोपदार । येथे उभे काठीकर ॥३॥ यवन अंगावरी थुंकला । प्रसाद देवुनी मुक्त केला ॥४॥ निळा शरण तुमच्या पायां । अनन्यभावे नाथराया ॥५॥