भजनी मालिका
← भजनांकडे परत

दळणीं दळीतां आठवे मानसीं । अलंकापुरवासी ज्ञानराज

dalanin dalitan athave manasin | alankapuravasi dnyanaraj

रचनाकार: संत निळोबा · अभंग
दळणीं दळीतां आठवे मानसीं । अलंकापुरवासी ज्ञानराज ॥१॥ वोविया मंगळी गाईन तयासी । स्वामी तुकयासी निजानंदे ॥२॥ एकाजनार्दन आणि नामदेव । देति स्वानुभव आठवितां ॥३॥ परलोकसोईरे जिवलग हे माझो । जें का पंढरिराजे अनुग्रहीले ॥४॥ निळा म्हणे संत जे जे भूमंडळीं । त्यांची पायधुळी वंदीन मी ॥५॥