भजनी मालिका
← भजनांकडे परत

चित्तींचें चैतन्य रुपीचे अनुकार

chittinchen chaitanya rupiche anukar

चित्तींचें चैतन्य रुपीचे अनुकार । रुप असे साचार नयनांमाजी । तेजाचें तेज दीपीं कळिका सामावे । दीपक माल्हावे तेज तेजीं ॥१॥ काय सांगो सखिये तेज पै अढळ । इंद्रियें बरळ देखतांची ॥२॥ घनदाट रुपीं एकरुप तत्त्व । दीपीं दीपसमत्व आप दिसे । निराकार वस्तु आकार पै अपार । विश्वीं चराचर बिंबलीसे ॥३॥ प्राण प्रिया गेली पुसे आत्मनाथा । कैसेनि उलथा गुरुखुणे ॥ बापरखुमादेवीवर विठ्ठलीं उपरति । रुपीं दीपदीप्ति एक जाली ॥४॥