भजनी मालिका
← भजनांकडे परत

चिदानंद रुप चेतवितें एक । एकपणें गुणागुणीं दावी अनेक

chidanand rup chetaviten ek | ekapanen gunagunin davi anek

चिदानंद रुप चेतवितें एक । एकपणें गुणागुणीं दावी अनेक ॥१॥ आदि अंतीं गुण सर्वत्र निर्गुण । गुणासी अगुण भासतीना ॥ध्रु०॥ कैसें जालें अरुपीं गुणीं गुणवृत्ती । सगुण पाहतां अंतरलें गती ॥२॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलु नंदनंदनु । आदिअंतु एकु पूर्ण सनातनु गे माये ॥३॥