भजनी मालिका
← भजनांकडे परत

छेदी विषयांचा समुळ कंदु । मग भेदु तुटेल

chhedi vishayancha samul kandu | mag bhedu tutel

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
छेदी विषयांचा समुळ कंदु । मग भेदु तुटेल ॥१॥ मूळ छेदितां वृक्ष खुडें । तैं समुळ विषय उडे ॥२॥ ऐसा अनुराग धरीं मनीं । देईं विषयासी पाणी ॥३॥ एका जनार्दनीं गोडी । सहज परमार्थ उघाडी ॥४॥