भजनी मालिका
← भजनांकडे परत

छाया पैं वृक्षाची बैसतां सुख । तैसा संसार देख प्राणिमात्रां

chhaya pain vrukshachi baisatan sukh | taisa sansar dekh pranimatran

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
छाया पैं वृक्षाची बैसतां सुख । तैसा संसार देख प्राणिमात्रां ॥१॥ गुंडती बळें गुंडती बळें । माझें माझें सळें काळतोंडें ॥२॥ असतां बरवी करिती आणिक सेवा । आवडली या देवा धांवे म्हणती ॥३॥ ऐसा काळतोंडा जनीं जाला वेडा । एका जनार्दनीं रेडा पशुजन्मीं ॥४॥