भजनी मालिका
← भजनांकडे परत

छळिला न येती रागावरी । तदाकरी वृत्ती मुराली

chhalila na yeti ragavari | tadakari vrutti murali

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
छळिला न येती रागावरी । तदाकरी वृत्ती मुराली ॥१॥ आपपर नाहीं जेथें । भेद तेथें नसेची ॥२॥ याती असो भलते परी । एकसरी जयासी ॥३॥ एका जनार्दनीं भाव । अवघियां ठाव एकची ॥४॥