भजनी मालिका
← भजनांकडे परत

चातकाची तृषा मेघें पुरविली

chatakachi trusha meghen puravili

चातकाची तृषा मेघें पुरविली । ब्रह्मस्तनीं पान्हईली बाईये वो ॥१॥ निवृत्तिप्रसादे माझ्या मुखीं सूदला । प्रेमरसें धारा फ़ुटल्या दोहीं पक्षीं ॥२॥ बाप श्रीगुरु तेणें मज आफ़विले । अवघें ब्रह्म दाविलें ज्ञानदेवा ॥३॥