भजनी मालिका
← भजनांकडे परत

चरणरज लागुनी उद्धरली अहिल्या बाळा । रामा तुझेनि प्रतापें तरली भवसागर शीळा

charanaraj laguni uddharali ahilya bala | rama tujheni pratapen tarali bhavasagar shila

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
चरणरज लागुनी उद्धरली अहिल्या बाळा । रामा तुझेनि प्रतापें तरली भवसागर शीळा ॥१॥ जयजय रामरामा शामा भवभंजन नांवें । तुझे रुप ध्यातां उमा शिवे निवे ॥२॥ रामनामें कळिकाळ कापती सदा । रामनामें गणिका नेली निजपदा ॥३॥ रामनामें उद्धरले सुर नर वानर । एका जनार्दनी सदा समाधि स्थिर ॥४॥