भजनी मालिका
← भजनांकडे परत

चालता पंढरीची वाट

chalata pandharichi vat

रचनाकार: संत बोधले · अभंग
चालता पंढरीची वाट । पुण्ये जोडली अनंत कोटी ॥१॥ मग पावलिया पंढरीसी । अनंत कोटे पुण्यरासी ॥२॥ देता हरिनामाची हाक । महा पातके घेती धाक ॥ ३ ॥ हाती वाजलिया टाळी । रंगी नाचतो वनमाळी ॥४॥ बोधला म्हणे आनंद जाला । विठोबा आपोआप आला ॥५॥