भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रह्मपदाची प्राप्ति उमगेल दृष्टी

brahmapadachi prapti umagel drushti

ब्रह्मपदाची प्राप्ति उमगेल दृष्टी । परम चैतन्यांचे पोटीं विश्वंभरु वो माय ॥१॥ अवघाचि देखिला अवघा मालवला । देखोनि निवाला जीवगे माय ॥२॥ कापुराची पुतळी कर्पुरदीपु पाजळी । तैसी मी त्याच्या मेळीं जाहाले वो माय ॥३॥ तेथें रुप ना छाया त्रिगुण ना माया । रखुमादेविवराचिया उपाये वो माय ।