भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोलाविल्यावांचूनि आला । उभा पाठीसी ठाकला । अवचित पुंडलिकें देखिला । मग पुजिला उपचारीं

bolavilyavanchuni ala | ubha pathisi thakala | avachit pundaliken dekhila | mag pujila upacharin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
बोलाविल्यावांचूनि आला । उभा पाठीसी ठाकला । अवचित पुंडलिकें देखिला । मग पुजिला उपचारीं ॥१॥ म्हणे आजी हें नवल झालें । मज अनाथा सांभाळिलें । ब्रीद आपुलें साच केलें । सुयाणें घडलें स्वामीचें ॥२॥ देव म्हणती तुझिया भावा । देखोनि पावलों विसांवा । उभा राहोनि करीन सेवा । न वजें आतां येथुनी ॥३॥ पंच महापातकी येती । तेही येथें मुक्त होती । ऐसा पुरस्करुनी पुंडलिकाप्रती । वरु दिधला त्रिवाचा ॥४॥ निळा म्हणे सात्विक जन । करिती तेथें हरि-कीर्तन । तें तों ब्रम्ह सनातन । पावती वचन हें सत्य ॥५॥