भजनी मालिका
← भजनांकडे परत

भुलाविलें वेणुनादें । वेणु वाजविला गोविंदें

bhulavilen venunaden | venu vajavila govinden

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भुलाविलें वेणुनादें । वेणु वाजविला गोविंदें ॥१॥ पांगुळलें यमुनाजळ । पक्षी राहिले निश्चळ ॥२॥ तृणचरें लुब्ध जालीं । पुच्छ वाहुनियां ठेलीं ॥३॥ नाद न समाये त्रिभुवनीं । एका भुलला जनार्दनीं ॥४॥