भजनी मालिका
← भजनांकडे परत

भुक्तीमुक्तीचें माहेर । संत उदार असती

bhuktimuktichen maher | sant udar asati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भुक्तीमुक्तीचें माहेर । संत उदार असती ॥१॥ देव ज्यांचें करी काम । देतो धाम आपुलें ॥२॥ तया वचनाची पाहे वास । पुरवी सौसर मनींची ॥३॥ एका जनार्दनीं विनित । संतचरणरज वंदीत ॥४॥