भजनी मालिका
← भजनांकडे परत

भुक्ति मुक्ति कारणें न घाली तुज

bhukti mukti karanen na ghali tuj

भुक्ति मुक्ति कारणें न घाली तुज सांकडीं हे तों ठायींचीचि जोडी । कांहीं जोडिली असे तूज नेणता हें तुझेचि दळवाडें ऐसें जाणोनि फुडें न बोले दातारा ॥१॥ सलिलीं रंग तरंगीं सलिल । निवडूनिया कोण वेगळें करील ॥२॥ उपाधिभेदें भूमि झाली भिंती ऐसें विचारिता चित्तीं अनु न देखे । इतुलालें जीवपण तूज मज दातारा वेगळेंचि नाहीरे गोवळ्या ॥३॥ दर्पणाचें दुजेपण दर्पण जंववरी तें काय वेगळाल्या व्यापारी ठेवूं येईल । नाम घेऊनि ठेले हेम अळंकार । इतुलाले अंतर तुज मज रया ॥४॥ वाहाटुळीची धांव केव्हडा वेळु आकाशीं । सहज स्वभावें निमे अपैसी । गगनावरि जाता नलगे पाल्हाळ । तैसें तुज मज सकळ ऐक्य रया ॥५॥ गगना वेगळा घटु केवि निपजे दातार यापरी सर्वेश्वरा तूं मी एक । बापरखुमादेविवरु विठ्ठलु भोगिया । येरी असतु वाउगिया गोठी रया ॥६॥