भजनी मालिका
← भजनांकडे परत

भोळा कर्पुरगौर भोळे ज्याचें मन । भोळ्या भक्ताधीन धांवेक भोळा

bhola karpuragaur bhole jyachen man | bholya bhaktadhin dhanvek bhola

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भोळा कर्पुरगौर भोळे ज्याचें मन । भोळ्या भक्ताधीन धांवेक भोळा ॥१॥ भोळे याचे गळां शोभे रुडमाळा । अर्धांगी तें बाळा पर्वताची ॥२॥ भोळें ज्याचें मन भोळें ज्यांचें ध्यान । भोळें ज्याचे वदन शोभतसे ॥३॥ एका जनार्दनीं प्रेमाचा पुतळा । भरो माझे डोळां सदोदित ॥४॥