भजनी मालिका
← भजनांकडे परत

भोळा देव । दाखविला आम्हां केला सन्मुख

bhola dev | dakhavila amhan kela sanmukh

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भोळा देव । दाखविला आम्हां केला सन्मुख ॥१॥ पंढरियें विटेवरीं । उभा व्दारीं पुंडलिका ॥२॥ संती केला परोपकार । आम्हां उध्दार दीनांचा ॥३॥ निळा म्हणे जवळी नेलें । हातीं दिलें निरवुनी ॥४॥