भजनी मालिका
← भजनांकडे परत

भोगितां काम भोगाचे सोहळे । परी अंतकाळीं कळे वर्म त्याचें

bhogitan kam bhogache sohale | pari antakalin kale varma tyachen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भोगितां काम भोगाचे सोहळे । परी अंतकाळीं कळे वर्म त्याचें ॥१॥ चालतां देह भोगातें भोगिती । अंतकाळीं होतीं दैन्यवाणे ॥२॥ भुलला पामर धरूनी भोग आशा । पुढे यमपाश कळेचिना ॥३॥ एका जनार्दनीं न कळेचि वर्म । कोण भवकर्म सोडवील ॥४॥