भजनी मालिका
← भजनांकडे परत

भोगायतन शरीर माझें । व्यर्थचि ओझें वागविलें

bhogayatan sharir majhen | vyarthachi ojhen vagavilen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भोगायतन शरीर माझें । व्यर्थचि ओझें वागविलें ॥१॥ सार्थक होय याचें तैसें । कराचि सौरसें आपुलिया ॥२॥ करुनियां कृपादान । सांभाळा दीन अनाथा ॥३॥ निळा म्हणे चरणीं ठेवा । स्मरणीं देवा नामाचे ॥४॥