भजनी मालिका
← भजनांकडे परत

भिन्न दावूनियां एक । एकीं भिन्नत्वाचें बीक

bhinna davuniyan ek | ekin bhinnatvachen bik

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भिन्न दावूनियां एक । एकीं भिन्नत्वाचें बीक ॥१॥ जेंवि बिंब प्रतिबिंब । दोन्हीं एकचि ते स्वंयभ ॥२॥ जैसी गोडी आणि गूळ । कापूर तोचि परिमळ ॥३॥ निळा म्हणे देवां भक्ता । निवडी कोण भिन्न आतां ॥४॥