भजनी मालिका
← भजनांकडे परत

भीमा दक्षिनवाहिनी । मध्यें पुंडलीक मुनी । विठ्ठल विटे समचरणी । भक्तालांगीं तिष्ठत

bhima dakshinavahini | madhyen pundalik muni | viththal vite samacharani | bhaktalangin tishthat

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भीमा दक्षिनवाहिनी । मध्यें पुंडलीक मुनी । विठ्ठल विटे समचरणी । भक्तालांगीं तिष्ठत ॥१॥ न म्हणे लहान थोर कांहीं । याती वर्णा विचार नाहीं । प्रेम भाव पायीं । येवढेंचि पुरे तेथें ॥२॥ दृढ धरुनी विश्वास । पाहे पंढरीनिवास । एका जनार्दनी दास । सर्वभावें अंकित ॥३॥