भजनी मालिका
← भजनांकडे परत

भेटिसी गेलीये तंव तीच जालिये

bhetisi geliye tanv tich jaliye

भेटिसी गेलीये तंव तीच जालिये । भुलली ठेलिये मज न कळे कांहीं । परतलिया दृष्टी जंव मागुता न्याहाळी । तंव काळी ना सावळी मूर्ति चोजवेना ॥१॥ काय सांगो माये न कळे तयाची सोये । येणें मनाचे मोडुनि पाये वेधियेलें ॥२॥ आंतु बाहेरी कैसी भरलेनि रंगें । क्षेम देऊं गेलें अंगे तंव तो जडूनि ठेला ॥ वारितां नावरे काय सांगो माय गोटी करुनि ठेला साठीं जीवित्वेसी ॥३॥ आशेचिये हावे तंव तो परतीचा धावे । निराशेसी पावे वेळु न लागतां । बापरखुमादीववरु विठ्ठलीं उपावो । ज्ञानदेवा भावो निवृत्तिपायीं ॥४॥