भजनी मालिका
← भजनांकडे परत

भेदचि याचा नये हातां । जाणिवा जाणतां नानापरी

bhedachi yacha naye hatan | janiva janatan nanapari

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भेदचि याचा नये हातां । जाणिवा जाणतां नानापरी ॥१॥ मतमतांतरें वृथाचि होती । याच्या न पवती दारवंटा ॥२॥ पाहों जातां बुध्दीचे डोळे । होताती आंधळे समोर या ॥३॥ निळा म्हणे नेदीचि कोणा । देखों आपणा लपवितसे ॥४॥