भजनी मालिका
← भजनांकडे परत

भेदबुद्धि पालटली । कृपा या विठ्ठलीं केली मज

bhedabuddhi palatali | krupa ya viththalin keli maj

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भेदबुद्धि पालटली । कृपा या विठ्ठलीं केली मज ॥१॥ प्रकाश जाहला देहादेहीं । वासना प्रवाहीं वहावली ॥२॥ विषयांचें तें लिगाड । जाहलें देशोधडी आपोआप ॥३॥ एका जनार्दनीं शरण । काया वाचा आणि मन ॥४॥