भजनी मालिका
← भजनांकडे परत

भवसिंधुसी उतार । हरिहर म्हणतां निर्धार

bhavasindhusi utar | harihar mhanatan nirdhar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भवसिंधुसी उतार । हरिहर म्हणतां निर्धार ॥१॥ हीच घ्या रे प्रचीत । सर्व पुरती मनोरथ ॥२॥ संसाराचा धंदा । वाचे म्हणा हरि गोविंदा ॥३॥ एका जनार्दनीं नाम । वाचे जप सोपा सुगम ॥४॥