भजनी मालिका
← भजनांकडे परत

भवसिंधु तराया नाम हें नौका । उतार तें लोका सोपा केली

bhavasindhu taraya nam hen nauka | utar ten loka sopa keli

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भवसिंधु तराया नाम हें नौका । उतार तें लोका सोपा केली ॥१॥ न घडे न घडे आणिक साधन । नाम पंचानन नाम पुरे ॥२॥ क्षणीक आयुष्य न घडे जप तपें । नाम गांता सोपें सर्व साधे ॥३॥ मंत्र तंत्र हवन नोहे विधियुक्त । तैं होत अपघात शरीराचा ॥४॥ एका जनार्दनीं तैसें नोहें नाम । तारक निजधाम प्राणिमात्रां ॥५॥