भजनी मालिका
← भजनांकडे परत

भवरोगियासी उपाय । धरावें तें संतपाय

bhavarogiyasi upay | dharaven ten santapay

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भवरोगियासी उपाय । धरावें तें संतपाय ॥१॥ तेणें तुटे जन्मजराकंद । वायां छंद मना नये ॥२॥ उपसना जे जे मार्ग । दाविती अव्यंग भाविकां ॥३॥ निवटोनी कामक्रोध । देती बोध नाममुद्रा ॥४॥ शरण एका जनार्दनीं । धन्य धन्य संतजनीं ॥५॥