भजनी मालिका
← भजनांकडे परत

भासतसे दोर विखाराचे परी । तैसीच थोरी प्रपंचाची

bhasatase dor vikharache pari | taisich thori prapanchachi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भासतसे दोर विखाराचे परी । तैसीच थोरी प्रपंचाची ॥१॥ भुलले भुलले प्रपंची गुंतले । वाया उगले बोल कां हे ॥२॥ श्वानाचियेपरी मागें पुढें पाहे । माझा म्हणोनी बाह्मा कवटाळिती ॥३॥ एका जनार्दनें अवकाळीं मेघ । तैसा प्रपंची दंभ लटिकाची ॥४॥