भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाळे भोळे नरनारी । येती प्रती संसत्वरीं पंढरीये

bhale bhole naranari | yeti prati sansatvarin pandhariye

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भाळे भोळे नरनारी । येती प्रती संसत्वरीं पंढरीये ॥१॥ करती स्नान वंदिती चरणां । क्षेत्र प्रदक्षिणा करिताती ॥२॥ आळविणे मृदंग मोहरी । गरुड टके शोभती करीं ॥३॥ करती आनंदे नामघोष । नाहीं आंस पायांवीण ॥४॥ एका जनार्दनीं कौतुकें । नाचतु सुखें भक्तराणा ॥५॥