भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तीं आराधिला देव । जाणवला भाव देवासीं तो

bhaktin aradhila dev | janavala bhav devasin to

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भक्तीं आराधिला देव । जाणवला भाव देवासीं तो ॥१॥ बहुत बरवें म्हणती भक्ता । न वजे परता जवळूनियां ॥२॥ सुखी असा माझया बळें । पुरवीन लळे इच्छाल ते ॥३॥ निळा म्हणे कृपाळु हरी । भक्तावरी तुष्टमान ॥४॥