भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तीचें तें ज्ञान वाचे नारायण

bhaktichen ten dnyan vache narayan

भक्तीचें तें ज्ञान वाचे नारायण । दया ते संपूर्ण सर्वांभूतीं ॥१॥ ज्ञान नारायण ध्यान नारायण । वाचे नारायण सर्वकाळ ॥२॥ संसारग्रामीं नाम हेंचि साठा । पावाल वैकुंठा नामें एकें ॥३॥ गोविंद गोपाळ वाचेसी निखळ । पद पावाल अढळ अच्युताचें ॥४॥ नामेंचि तरले शुकादिक दादुले । जडजीव उध्दरले । कलियुगी ॥५॥ स्मरण करीता वाल्मीक वैखरी । वारुळा भीतरीं रामराम ॥६॥ सर्वांमाजी श्रेष्ठ पुण्यभूमि वैकुंठ । विठ्ठल मूळपीठ जगदोध्दार ॥७॥ निवृत्ति निरोपण ज्ञानदेवा ध्यान । सर्वत्र नारायण एकरुप ॥८॥