भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्ती भावा ठाव नाही

bhakti bhava thav nahi

रचनाकार: संत बोधले · अभंग
भक्ती भावा ठाव नाही । कवित्व करी उभे घाई ॥ १॥ लोकाप्रती वाचितो पोथी पुराण । आपण भरले आडराने ॥ २॥ देखत देखत ठाकिती लोका । आपण घेती लोकांचा थुका ॥३॥ हाती घेऊनी फिरवितो माळा । पन्नास घालुनी कापी गळा ॥४॥ त्या चांडाळा मोक्ष नाही । ते पडती नर्कवाही ॥५॥ अंतरी भेदाचे परी । जीव मारुनी पैसे वरी ॥६॥