भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तपणा सान नव्हे रे भाई । भक्तीचें पाय देवाचे हृदयीं

bhaktapana san navhe re bhai | bhaktichen pay devache hrudayin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भक्तपणा सान नव्हे रे भाई । भक्तीचें पाय देवाचे हृदयीं ॥१॥ भक्त तोचि देव भक्त तोचिक देव । जाणती हा भाव अनुभवीं ॥२॥ दान सर्वस्वे उदार बळी । त्यांचें द्वार राखे सदा वनमाळी ॥३॥ एका जनार्दनीं मिती नाहीं भावा । देवचि करितो भक्ताची सेवा ॥४॥