भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तांच्या उपकारासाठीं । नोहे पालट उतराई

bhaktanchya upakarasathin | nohe palat utarai

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भक्तांच्या उपकारासाठीं । नोहे पालट उतराई ॥१॥ ज्ञानोबाची भिंत वोढी । उच्छिष्टपात्रें काढी धर्माघरीं ॥२॥ जेवी नामदेवासंगे साचें । सुदाम्याचें पोहे भक्षी ॥३॥ विष पितो मिराबाईसाठी । विदुराच्या हाटी कण्या स्वयें ॥४॥ एकजनार्दनीं अंकितपणें । द्वार राखणें बळींचें ॥५॥