भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तांचिये मनीं जैसें । करि हा तैसें वर्तन

bhaktanchiye manin jaisen | kari ha taisen vartan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भक्तांचिये मनीं जैसें । करि हा तैसें वर्तन ॥१॥ नेदी होऊं आज्ञें भंग । वोडवी सर्वांग सेवेसी ॥२॥ स्तंभी पाचारितां हाके । होऊनी ठाके नरहरी ॥३॥ निळा म्हणे उभा व्दारीं । केला विटेवरी मग ठाके ॥४॥