भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्ताचे मनोरथ पुरवी नारायण । अवतार म्हणोनी धरी स्वयें

bhaktache manorath puravi narayan | avatar mhanoni dhari svayen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भक्ताचे मनोरथ पुरवी नारायण । अवतार म्हणोनी धरी स्वयें ॥१॥ नामदेवाप्रती जाहला अभिमान । लाडिकाचि पूर्ण मी तो भक्त ॥२॥ कौतुक दावावया माव देव करिती । नामदेवाप्रती काय बोले ॥३॥ एका जनार्दनीं परिसा सादर । देव भक्तांचा परिकर संवाद तो ॥४॥