भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्त भावाच्या संपत्ती । भोगा ऐश्वयें श्रीपती

bhakta bhavachya sampatti | bhoga aishvayen shripati

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भक्त भावाच्या संपत्ती । भोगा ऐश्वयें श्रीपती ॥१॥ करा त्यांचे समाधान । न सांडितां सिंहासन ॥२॥ केली नामाची घोकणी । जिहीं तुमच्या चक्रपाणी ॥३॥ निळा म्हणे ठेविली जिहीं । निष्ठा अखंड तुमचे पायीं ॥४॥