भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाग्यांचें भाग्य धन्य तें संसारीं । सांठविती हरि हृदयामाजीं

bhagyanchen bhagya dhanya ten sansarin | santhaviti hari hrudayamajin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भाग्यांचें भाग्य धन्य तें संसारीं । सांठविती हरि हृदयामाजीं ॥१॥ धन्य त्यांचें कुळ धन्य त्याचें कर्म । धन्य त्याचा स्वधर्म नाम मुखा ॥२॥ संकटीं सुखात नाम सदा गाय । न विसंबे देवराया क्षण एक ॥३॥ एका जनार्दनीं धन्य त्यांचे दैव । उभा स्वयमेव देव घरीं ॥४॥