भजनी मालिका
← भजनांकडे परत

भगवदीता हेचि थोर

bhagavadita hechi thor

भगवदीता हेचि थोर । येणें चुके जन्म वेरझार । वैकुंठवासी निरंतर । भवसागर उतरेल ॥१॥ राम नाम सार धरी । तूंचि तारक सृष्टीवरी । त्याचेनि संगें निरंतर । भवसागर तरसील ॥२॥ व्यर्थ प्रंपच टवाळ । येणें साधिली काळवेळ । नाम तुझें जन्म मूळ । हें केवळ परिसावें ॥३॥ विक्राळ साधिलें नाम । दूर होतील विघ्न कर्म । साधितील धर्म नेम । हे पुरुषोत्तम बोलियले ॥४॥ तंव अनुष्ठान सुगम । साधिले सर्व सिध्दि नेम । क्षेम असेल सर्व धर्म । सर्वकाळ फळले ॥५॥ ज्ञानदेव कर्म अकर्ता । पावन झाला श्रीअनंता । सुखदु:खाचा हरी भोक्ता । सर्वकाळ आम्हा आला ॥६॥