भजनी मालिका
← भजनांकडे परत

बरें झालें येथें आलोंसे सायासें । सुख दु:ख लेशे भोगोनियां

baren jhalen yethen alonse sayasen | sukh du:kha leshe bhogoniyan

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
बरें झालें येथें आलोंसे सायासें । सुख दु:ख लेशे भोगोनियां ॥१॥ मागिला लागाचें केलेंसे खंडण । तेणें समाधान वृत्ति होय ॥२॥ एकसरें मन ठेविले बांधोनी । निवांत चरणीं तुमचीया ॥३॥ चोखा म्हणे काम क्रोध तोडियेले । येर ते ही केले देशधडी ॥४॥