भजनी मालिका
← भजनांकडे परत

बांधूनियां पर्णकुटी मुढी । त्यावरी गुढी अद्वैताची

bandhuniyan parnakuti mudhi | tyavari gudhi advaitachi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बांधूनियां पर्णकुटी मुढी । त्यावरी गुढी अद्वैताची ॥१॥ ऐसें मिरविती सोंग वायां । नरका जावया उल्हासें ॥२॥ नेणें कधीं सतांचें पूजन । सदां सर्वदां परधनीं मन ॥३॥ शरण एका जनार्दनीं । ऐसें सोंग मिरवितींअ जनीं ॥४॥