भजनी मालिका
← भजनांकडे परत

बळीचे द्वारी आपण वामन झाला । इंद्राच्या कैवारें बळी पाताळीं घातिला

baliche dvari apan vaman jhala | indrachya kaivaren bali patalin ghatila

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बळीचे द्वारी आपण वामन झाला । इंद्राच्या कैवारें बळी पाताळीं घातिला ॥१॥ तोचि महाराज उभा विटेवरी । करे धरिले कटीं पावलें दोन्हीं साजिरीं ॥२॥ भक्ताचिया काजा विटे उभा राहिला । एका जनार्दनीं देव डोळां पाहिला ॥३॥