भजनी मालिका
← भजनांकडे परत

बालका देखोनि संकटीं । माता कार्य टाकुनि उठी

balaka dekhoni sankatin | mata karya takuni uthi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बालका देखोनि संकटीं । माता कार्य टाकुनि उठी ॥१॥ ऐसें दयेचे ठायीं जाण । आपुलें जाणावें पारिखेपण ॥२॥ महापुरी बुडे तयातें । उडीं घाली कृपाळु तेथें ॥३॥ दीनाचिये लाभी । जो निघे जळतीये अंगीं ॥४॥ ऐसे दयेचे पाळी लळे । एका जनार्दनीं चरणीं लोले ॥५॥