भजनी मालिका
← भजनांकडे परत

बाजारीं बैसोनि सांगें ज्ञान गोष्टी । कथेचि राहाटी वोपावोपी

bajarin baisoni sangen dnyan goshti | kathechi rahati vopavopi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बाजारीं बैसोनि सांगें ज्ञान गोष्टी । कथेचि राहाटी वोपावोपी ॥१॥ मेळवोनी जन सांगे निरूपण । वाचे ब्रह्मज्ञान पोटासाठीं ॥२॥ न कळे पामरा आपुला विचार । करी अनाचार जगामध्यें ॥३॥ एका जनार्दनीं ऐसें फजीतखोर । भोगिती अघोर नरक देखा ॥४॥