भजनी मालिका
← भजनांकडे परत

बैसोनि एकांतीं । सदा ध्यावी विठ्ठलमूर्ती

baisoni ekantin | sada dhyavi viththalamurti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बैसोनि एकांतीं । सदा ध्यावी विठ्ठलमूर्ती ॥१॥ तेणें चुके रे बंधन । आन न करी साधने ॥२॥ हेंचि वेदशास्त्रांचें सार । आगमनिमांचा पसर ॥३॥ एका जनार्दनीं रुप । पाहतां आमुप उद्धार ॥४॥