भजनी मालिका
← भजनांकडे परत

बैसवूनि आले गोधनें आखरीं खेळ नानापरी मांडियेला

baisavuni ale godhanen akharin khel nanapari mandiyela

रचनाकार: संत निळोबा · अभंग
बैसवूनि आले गोधनें आखरीं खेळ नानापरी मांडियेला ॥१॥ वाजविती पावे मोह्या घमुती । छंदें त्या नाचती गाती ब्रीदें ॥२॥ आलके सेलके हमामा हुंबरी । झोंब्या घेती कुसरी निवडुनी गडी ॥३॥ लगोरियाचे चेंडु सुरकाडी मुरदांग । नानापरि आंग मोडुनियां ॥४॥ निळा म्हणे हरी पाहोनी निराळा । अवघियांच्या खेळा साक्षपणें ॥५॥