भजनी मालिका
← भजनांकडे परत

बैसविती हरी अस्त्र घडीवरी । पूजा करती वरी पुष्पपत्रें

baisaviti hari astra ghadivari | puja karati vari pushpapatren

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बैसविती हरी अस्त्र घडीवरी । पूजा करती वरी पुष्पपत्रें ॥१॥ धाउनी गळां पाले माळा त्या वाहाती । गजरें नाचती पुढें येक ॥२॥ टिरीया माडिया वाजविती पाय । हरुषें नाचताहे देवराया ॥३॥ ऐसें नित्यानित्य क्रीडा ते करिती । देव ते पाहाती विमानीं तें ॥४॥ म्हणताती देव वंचलों या सुखा । एका जनार्दनीं देखा गोवियलें ॥५॥