भजनी मालिका
← भजनांकडे परत

बैसलें आसनीं । रुप चित्ताचे चिंतनीं

baisalen asanin | rup chittache chintanin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
बैसलें आसनीं । रुप चित्ताचे चिंतनीं ॥१॥ दुजें नाठवे सर्वथा । आण तुझी पंढरीनाथा ॥२॥ डोळियां आवडी । रुपीं तुमच्या तयां गोडी ॥३॥ निळा म्हणे जीवनकळा । वेधीं वेधल्या त्या सकळा ॥४॥